दिंडोरी प्रणीत फार्मर प्रोड्यूसर कंपनी हि आध्यात्मिक शेतीतील पहिली अॅग्रॅो कंपनी आहे. आमच्या मार्फत संतुलित व सात्विक खाद्यान्ने वितरीत आणि विस्तारित केली जातात. परिपोषक आणि नैसर्गिक आध्यात्मिक शेतीमधून तयार होणारे धान्य आणि त्यापासून निर्माण होणारे सात्विक व पौष्टिक पदार्थ यांमधला दुवा म्हणून सात्विक कृषीधन कार्यरत आहे.

आम्ही नैसर्गिकरित्या धान्य पिकवून, त्यावर संस्कार करून त्याला सकारात्मक उर्जेने परिपूर्ण करून आमच्या ब्रँड अंतर्गत सर्व सामान्य ग्राहकांपर्यंत पोहचवतो. आम्ही उच्च पौष्टिक आहाराच्या लागवडीसाठी नैसर्गिक तंत्रज्ञानानाचा वापर करून, नैसर्गिक शेतीविषयी आधिक लक्ष केंद्रित करतो. आमच्या प्रक्रिया ह्या सात्विक धान्य संस्कारासह १००% नैसर्गिक पद्धतीच्या आहेत.